Thursday, May 19www.babalkhabar.com : For your kind information
Shadow

जुळी मुलं आहेत का यावर भारती सिंह म्हंटली, अडीच महिने काही कळलंच नाही मग..

आपल्या उत्तम विनोदबुद्धीने सगळयांना हसवणारी भारती सिंह टी. व्ही वरचा लोकप्रिय कार्यक्रम देश के हुनरबाज यात निवेदिका म्हणून काम करत आहे त्यात तिच्यासोबत तिचे पती हर्ष लिंबाचिया दिसून येतात. यात विशेष हे आहे की भारती गरोदर आहे आणि अशा अवस्थेत ती गरोदरपणाच्या शेवटच्या दिवसात देखील काम करत आहे.

एप्रिल महिन्यात भारती आणि हर्ष आई बाबा होतील अशी अपेक्षा आहे. सगळीकडे अशी चर्चा होत आहे की भारतीला जुळे मुलं होतील , यावर भारतीने आपली प्रतिक्रिया दिली आहे यावर दिलखुलास बोलली आहे.

भारती आणि हर्ष ने २०१७मध्ये गोव्यात धुमधडाक्यात लग्न केले होते,त्यानंतर ४ वर्षांनी डिसेंबर २०२१ ला त्यांनी आपण आई बाबा होणार असल्याचे जाहीर केले होते. यावर बोलताना भारतीने सांगितले कि, मी खात होते, शूटिंग करत होते , डान्स दिवाने यासाठी डान्स करत होते.. त्यात एक दिवस मी टेस्ट केली तर त्यावर दोन रेषा आल्या मी बाहेर येऊन ही गोष्ट हर्षला सांगितली , आमच्यासाठी हा धक्का होता कारण आम्ही असा विचार अजूनही केला नव्हता.

जुळी मुले होण्याबाबत प्रतिक्रिया देताना तिने म्हणले कि, तुम्हाला असे का वाटते की हे जुळ्या मुलांचे पोट आहे, पण असे नाही आहे फक्त एकच आहे, आम्ही दोघेही खूप वाट बघत आहोत. पण अजूनही मला बाळाविषयी प्रेम वाटत नाही, मी हर्षला नेहमी विचारत असते की प्रेम कधी होईल ?? सगळे म्हणतात ज्यावेळी हातात येईल तेव्हा होईल पण माहीत नाही कि हातात कधी येईल??

 

View this post on Instagram

 

A post shared by Bharti Singh (@bharti.laughterqueen)

जेव्हा भारतीला विचारले की ती गरोदर असताना देखील काम का करत आहे ? तर यावर तिने सांगितले की, गरोदरपणात ज्या स्त्रिया काम करताना त्याविषयी विचार बदल करण्यासाठी ती काम करत आहे, अशा अवस्थेत काम करू शकतो हे तिला सांगायचे आहे. ती म्हणते की मी भारताची पहिली गरोदर निवेदिका होणार आहे.

आतातरी ती आपल्या पती सोबत हुनरबाज या कार्यक्रमाची शान वाढवत आहे. यात अभिनेत्री परिणीती चोप्रा, मिथुन चक्रवर्ती आणि करण जोहर हे परीक्षकांच्या भूमिकेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!