Thursday, May 19www.babalkhabar.com : For your kind information
Shadow

ही आहे आयपीएलची आतापर्यंतचे सर्वात ग्लॅमरस संघ मालकीन, जाणून घ्या कोण आहे

आयपीएलमध्ये केवळ क्रिकेट रोमांचच नाही तर ग्लॅमरचा तडका ही पाहायला मिळतो. या मेगा T20 लीगच्या सामन्यांदरम्यान, अनेक फ्रँचायझींचे मालक ‘सेंटर ऑफ एक्स्ट्रॅक्शन’ बनतात. या स्पर्धेतील आतापर्यंतच्या सर्वाधिक लोकप्रिय महिला मालकांच्या यादीवर एक नजर टाकूया.

शिल्पा शेट्टी- शिल्पा शेट्टी आणि तिचे पती राज कुंद्रा यांनी राजस्थान रॉयल्समध्ये 11.7 टक्के हिस्सा खरेदी केला आहे. ही बॉलीवूड अभिनेत्री अनेक प्रसंगी तिच्या टीमला चिअर करताना दिसली आहे . स्पॉट-फिक्सिंगमुळे या संघावर 2 वर्षांची बंदी घालण्यात आली होती, त्यानंतर या जोडप्याने RR ची मालकी गमावली.

जूही चावला- जुही चावला ही कोलकाता नाईट रायडर्सची या आयपीएल टीम ची सहमालक आहे. KKR संघात तिची भागीदारी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानसोबत आहे. गायत्री रेड्डी- गायत्री रेड्डी ही डेक्कन क्रॉनिकलचे मालकीन आहे ती वेंकटराम रेड्डी यांची मुलगी आहे, त्यांच्याकडे आयपीएल टीम डेक्कन चार्जर्स चा मालकी हक्क होती. आयपीएलच्या अनेक सामन्यांदरम्यान ती स्टँडवर दिसली आहे. चाहत्यांनी तिची तुलना दक्षिण भारतीय अभिनेत्रीशी केली आहे. तिने खेळाडूंच्या लिलावातही भाग घेतला होता. हा संघ २०१२ मध्ये संपुष्टात आला.

प्रीति जिंटा- प्रिती झिंटा ही आयपीएलमधील सर्वात क्यूट मालकीन मानली जाते. या बॉलिवूड अभिनेत्रीचे गालावरील डिंपल चाहत्यांना खूप आवडतात. ती पंजाब किंग्जची सहमालकीन आहे. ती खेळाडूंना पूर्ण पाठिंबा देते असते.

काव्या मारनकाव्या मारन – सन ग्रुपचे मालक कलानिती मारन यांची काव्या मारनकाव्या ही मुलगी आहे. सनरायझर्स हैदराबाद (SRH) हा त्याचा संघ आहे. काव्या मारन ही कलानिधी मारन यांची मुलगी आणि माजी केंद्रीय मंत्री दयानिधी मारन यांची भाची आहे. 29 वर्षीय काव्या स्वतः सन म्युझिकशी संबंधित आहे. ती पहिल्यांदा आयपीएल 2018 मध्ये टीव्हीवर तिच्या टीम SRH ला सपोर्ट करताना दिसली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!