Thursday, May 19www.babalkhabar.com : For your kind information
Shadow

Video : IPL चा सर्वात वाईट DRS, आऊट झाल्या नंतरही खेळाडूने घेतला रिव्ह्यू….

IPL २०२२ च्या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्सने ५३ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा ७५ धावांनी पराभव केला.यामुळेच लखनऊ सुपरजायंट्स हा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर मजल मारण्यात यशस्वी झाला आहे. या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्सने प्रथम फलंदाजी करत १७६ धावा केल्या. प्रत्युत्तरात या लक्ष्याचा पाठलाग कोलकाता नाईट रायडर्स करू शकला नाही आणि संपूर्ण संघ हा फक्त १०१ धावांवर गारद झाला.

या सामन्यातही कोलकाता नाईट रायडर्सचे फलंदाज फ्लॉप ठरले असून, आंद्रे सेल्स वगळता एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आलेली नाही. सामन्या मध्ये चाहत्यांचे लक्ष वेधून घेणारे अनेक प्रसंग आले असले तरी, कोलकाताचा फलंदाज अनुकुल रॉयने बाद झाल्यानंतर रिव्ह्यू घेतला, ज्यामुळे चाहते सुद्धा खूप आश्चर्यचकित झाले.

वास्तविक ही घटना १३ व्या षटकाची आहे, कोलकाता नाईट रायडर्सच्या इनिंगमध्ये १३ वी ओव्हर आवेश खानने केली होती. आवेश खानने या ओव्हरचा तिसरा चेंडू लेग-साइड टाकला, त्यानंतर चेंडू अनुकुल च्या ग्लोव्हज ला लागून तो थेट क्विंटन डी कॉक ने झेल घेतला. अनुकुल रॉय आऊट झाल्याचे क्विंटन डी कॉकला माहीत होते आणि अंपायरनेही संकेत दिला होता.

अनुकुल रॉयला सुद्धा तो बाद झालाय हे माहिती होते. परंतु अनुकुल रॉयच्या मनात काय चालले होते हे कोणालाच माहित नाही आणि त्याने DRS घेऊन शेवटी तो वाया घालवला. रिप्लेमध्ये पाहिले असता अनुकुल रॉयच्या ग्लोव्हला चेंडू स्पर्श होऊन थेट डी कॉकच्या हातात गेला असल्याचे स्पष्ट झाले. DRS वाया घालवल्यामुळे अनुकुल रॉय यांना सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!