चेन्नई सुपर किंग्ज (CSK) साठी IPL मोसम इतका काही खास नाही. आतापर्यंत १० पैकी ७ सामने गमावून हा संघ प्ले-ऑफमधून बाहेर पडला आहे. आता संघ पुढील हंगामाच्या तयारीला सुरुवात करेल. यावेळी संघाची कामगिरी गोलंदाजीपासून ते फलंदाजीपर्यंत एकदम खराब होती.
अॅडम मिलने आणि दीपक चहर यांच्या अनुपस्थितीमुळे ३ विजय उत्तीर्ण होऊन पार पडले. आता यातून धडा घेत संघाच्या पुढील मोसमात युवा आणि अनुभवी खेळाडूंचा समावेश केला जाईल असे संकेत चेन्नई कडून येत आहेत. या लेखात आम्ही पुढील मोसमात चेन्नई सुपर किंग्ज कोणत्या ३ खेळाडूंना खरेदी करू शकतात हे सांगणार आहोत.
१- मिचेल स्टार्क
यावेळी चेन्नई सुपर किंग्जने दीपक चहर आणि अॅडम मिलने यांना गोलंदाज म्हणून खरेदी केले, परंतु यावेळी दोन्ही खेळाडू दुखापतीमुळे अध्याप संघात खेळू शकले नाहीत, त्यामुळे सध्याच्या मोसमात संघाला प्लेऑफमधून बाहेर पडावे लागणार आहे.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क चालू मोसमात आला नसला तरी त्याने पुढील मोसमात IPL खेळण्याचे आश्वासन दिले आहे. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिचेल स्टार्क CSK चा भाग बनून संघाला मजबूत करण्याचा प्रयत्न करेल.
२- सैम करन
IPL २०२२ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज च्या पराभवाचे एक प्रमुख कारण म्हणजे संघाचे गोलंदाज आणि अष्टपैलू काही खास कामगिरी करू शकले नाहीत. इंग्लंडचा गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू सॅम कुरण IPL च्या या मोसमात खेळेल अशी अपेक्षा होती मात्र सॅम कुरण ने दुखापती मुळे आपले नाव मागे घेतले.
View this post on Instagram
दुखापतीमुळे तो IPL २०२२ खेळू शकला नाही. सॅम कुरण पुढच्या IPL मध्ये पुनरागमन करेल अशी आशा आहे. सॅम कुरण हा यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जचा भाग होता आणि पुढील मोसमात तो चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना दिसेल अशी सुद्धा अपेक्षा आहे.
३- शेख रशीद
चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघातील बहुतेक खेळाडू वृद्ध होत आहेत. त्यात रॉबिन उथप्पा, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंग धोनी यांचा समावेश आहे. संघात युवा खेळाडूंचा अभाव आहे. या पराभवातून धडा घेत संघ युवा खेळाडूंवर अधिक बाजी मारेल, असे मानले जात आहे. यामध्ये१९ वर्षाखालील सर्वोत्तम फलंदाज ठरलेल्या शेख रशीद याला सलामीवीर म्हणून घेऊ शकतो. तसेही CSK च्या संघाला नवीन खेळाडूंना खरेदी करावे लागेलच असे वक्तव्य बऱ्याच अनुभवी लोकांनी दिले आहे.