Thursday, May 19www.babalkhabar.com : For your kind information
Shadow

२००७ साली धोनीला कर्णधारपद दिले होते त्यावर युवराज म्हणाला, ‘BCCI ने कोणालाही कर्णधार बनवले असते पण मला नाही’…

BCCI ने २००७ साली T२० विश्वचषकासाठी भारतीय संघाचा कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनीची नियुक्ती केल्यावर सर्व क्रिकेट चाहते आणि खेळाडू आश्चर्यचकित झाले होते. कारण त्यावेळी भारतीय संघात अनेक ज्येष्ठ खेळाडू होते जे कर्णधारपदाच्या शर्यतीत होते.परंतु त्या वरिष्ठ खेळाडूंमध्ये कर्णधारपदाचा सर्वात मोठा दावेदार युवराज सिंग होता. कारण त्यावेळी राहुल द्रविड आणि इतर अनेक वरिष्ठ खेळाडूंनी २००७ च्या T२० विश्वचषकातून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे युवराज सिंग हा कर्णधारपदाचा प्रबळ दावेदार मानला जात होता.

२००७ च्या T२० विश्वचषकापूर्वी इंग्लंड दौऱ्यात युवराज सिंग भारतीय संघाचा उपकर्णधार आणि राहुल द्रविड कर्णधार होता. या कारणामुळे देखील युवराज सिंग कर्णधारपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे मानले जात होते. मात्र, युवराज सिंगऐवजी महेंद्रसिंग धोनीला कर्णधार बनवून निवडकर्त्यांनी आपला निर्णय योग्य असल्याचे दाखवून दिले. कारण महेंद्रसिंग धोनीने २००७ चा टी-२० विश्वचषक धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकला होता. निवडकर्त्यांनी त्याला कर्णधार बनवल्यानंतर ग्रेग चॅपल प्रकरणामध्ये सचिन तेंडुलकरला पाठिंबा दिल्याने आपण भारतीय संघाचे कर्णधारपद गमावल्याचे युवराज सिंगने सांगितले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yuvraj Singh (@yuvisofficial)


युवराज सिंगने स्पोर्ट्स १८ वर संजय मांजरेकर यांच्या मुलाखती दरम्यान संवाद साधताना सांगितले की, ‘मला कर्णधार बनायचे होते… त्यानंतर ग्रेग चॅपल प्रकरण घडले. मला चॅपल किंवा सचिन यापैकी एकाला सपोर्ट करावा लागणार होता. कदाचित मी एकमेव असा खेळाडू आहे ज्याने त्याच्या सहकाऱ्याला साथ दिली. जे BCCI च्या अनेक अधिकाऱ्यांना आवडले नाही. त्यावेळी तइ कोणालाही कर्णधार बनवू शकत होते पण मला नाही, असे ऐकायला मिळाले.

तो पुढे म्हणाला की, ‘या प्रकरणात कितपत तथ्य आहे याची मला खात्री नाही. पण अचानक मला उपकर्णधारपदावरून वगळण्यात आले. सेहवागही त्यावेळी संघात नव्हता त्यामुळे मला वाटले की मी कर्णधार होणार आहे. पण कर्णधारपदात कुठेही नाव नसलेला धोनी अचानक २००७ च्या टी-20 विश्वचषकाचा कर्णधार झाला. युवराज पुढे म्हणाला की, ‘वीरेंद्र सेहवाग इंग्लंड दौऱ्यावर गेला नव्हता आणि मी त्यावेळी राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली उपकर्णधार होतो. त्यामुळे मी कर्णधार होण्याचे जवळपास निश्चितच झाले होते. हा निर्णय माझ्या विरोधात गेला पण मला त्याबद्दल कोणताही पश्चाताप नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!