गुजरातने IPL २०२२ च्या ५७ व्या सामन्यात वर्चस्व गाजवले आणि प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ ठरला. जेथे संघाच्या एकत्रित कामगिरीनंतर संघाने एकतर्फी विजय नोंदवला. तत्पूर्वी, नाणेफेक जिंकल्यानंतर गुजरातने फलंदाजी केली आणि लखनऊला एक छोटेसे लक्ष्य दिले, या सामन्या वेळी चेंडू बॅट वर नीट येत न्हवता आणि हे गुजरात टीमने लक्षात घेतले. याच गोष्टीच्या अभ्यासाने GT च्या गोलंदाजांनी फायदा घेतला. गुजरातच्या फलंदाजांनी त्यांच्या संघाला असे काही सल्ले दिले की जेणेकरुन LSG च्या फलंदाजांना फलंदाजी करण्यास त्रास होईल. फलंदाजांना फुल लेंथ च्या चेंडूवर खुप समस्या जाणवत होती आणि गुजरातच्या गोलंदाजांनी त्याचा पुरेपूर फायदा घेतला.
टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना हार्दिकच्या संघाने खेळलेल्या २० षटकांत ४ विकेट्स गमावून १४४ धावा केल्या. शुबमनने ६३ धावांसह उत्कृष्ठ अशी खेळी केली. येथे संघाला जलद धावा करण्याची गरज भासली नाही पण एक चांगली धावसंख्या उभा केली पाहिजे होती . अवेश खानने गोलंदाजी करताना लखनऊसाठी २ विकेट्स घेतल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊ चा संघ १३.२ षटकांत ८२ धावांवर गारद झाली. जिथे दीपक हूडाने २७ धावांची सर्वाधिक खेळी केली. त्याच वेळी, दुसरा सर्वोच्च धावसंख्या करणारा खेळाडू आवेश खान ठरला, त्याने ४ चेंडूंमध्ये १२ धावा केल्या, ज्यात दोन उच्च-उंच षटकारांचा समावेश होता.
रशीद खानला रिमांडवर घेऊन एक दमदार षटकार मारला, त्याक्षणी हार्दिक पांड्यला घामच फुटला. जेथे हार्दिकला असा विश्वास नव्हता की आवेश खान एका उत्कृष्ट फलंदाजासारखा षटकार मारू शकेल.रशीद खान ने लखनऊ संघाचे सर्वाधिक खेळाडू बाद केले, त्याने ३.५ षटकांत फक्त २४ धावा दिल्या आणि ४ गडी बाद केले. यश दयाल आणि किशोर यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. जिथे राशीदने दीपक, क्रुनल, धारक आणि आवेश खानची विकेट घेतली.
— Cricket IPL (@CricketIPL20) May 11, 2022
आवेश खानचा गगनचुंबी षटकार- आवेश खानने आक्रमक मार्गाने उत्कृष्ठ फलंदाजी केली आणि रशीद खान च्या १४ व्या षटकात २ जोरदार षटकार लगावले. षटकांच्या दुसर्या चेंडूवर पहिला षटकार आणि तिसऱ्या चेंडूवर दुसरा षटकार आवेश ने ठोकले . तथापि, त्याच षटकात रशीद खानने आवेश ला लव्हेलीयन चा रस्ता दाखवत सामना गुजरात च्या पारड्यात ओढला.