IPL २०२२ चा मोसम आता त्याच्या अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहेत. पण यानंतर भारतात क्रिकेट चे मनोरंजन कमी होत नाही. तमिळनाडू प्रीमियर लीग (TNPL) च्या भरघोस यशानंतर, आंध्र क्रिकेट संघटनेचे पुरुष आणि स्त्रिया यांनी आंध्रप्रदेश प्रीमियर लीग (APL) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या गोष्टीची माहिती ८ मे रविवार रोजी होते APL गवर्निंग परिषद चे अध्यक्ष तसेच पूर्व रणजी खेळाडू सत्य प्रसाद यचेंद्र यांनी ही माहिती मीडियाला दिली आहे.
APL ची सुरुवात होणार २२ जून पासून
आंध्र क्रिकेट संघटनेचे कडून प्राप्त झालेल्या माहिती नुसार, पुरुष APL चे आयोजन हे २२ जून पासून ३ जुलै पर्यंत असेल. ही स्पर्धा स्पर्धा YSR-ACA-VDA स्टेडियम वर होणार आहे .तसेच या लीग साठी एकूण ६ संघ खेळवले जातील. महिला APL ची सुरुवात २८ जून पासून होईल आणि त्यामध्ये ४ संघ समाविष्ट होतील. २८ जून ते ३ जुलै पर्यंत हा महिला APL चालेल. महिला APL लीगचे आयोजन हे विजयनगर मध्ये होणार आहे,आणि अंतिम सामने विशाखापट्टणम येथे खेळवले जातील.
या वेळापत्रका नुसार खेळवले जातील APL चे सर्व सामने-
आंध्र प्रदेश लीग च्या सामन्या बद्दल माहिती द्यावयाची झाली तर पुरुष APL चे एकूण १९ सामने होणार आहेत ज्यामध्ये प्रत्येक दिवशी दोन सामने खेळवले जाणार. पुरुषांचा पहिला सामना ९.३० ला सुरू होऊन १२.३० ला समाप्त होईल तसेच दुपारी १ वाजता दुसरा सामना सुरू होईल आणि तो ५ वाजेपर्यंत संपेल. पुरुषांच्या ६ संघमधील ४ संघ हे क्वालिफाय मध्ये जाऊन पुढील सामने खेळतील. तसेच प्राप्त झालेल्या माहिती नुसार महिला APL चे सामने प्रतिदिन २ खेळवले जाणार. त्याची वेळ सायंकाळी ६ ते ९.३० असणार आहे आणि महत्वाचे म्हणजे हे सामने फ्लड लाईट मध्ये खेळवले जातील. अंतिम चे सर्व सामने विशाखापट्टणम येथे पार पडतील.
APL ला प्रेक्षकांना असणार मोफत प्रवेश-
सत्य प्रसाद यांनी दिलेल्या संभाषणात असे सांगितले की स्पर्धेचे प्रसारण OTT प्लॅटफॉर्मवर सुद्धा केले जाणार आहे.OTT प्रसारणासाठी OTT आणि ब्रॉडकास्टिंग भागीदाऱ्यां सोबत सुद्धा बोलणे सुरू आहे . त्याच वेळी, ते म्हणाले की स्टेडियम मध्ये सामना पाहण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.सर्वांना मोफत मध्ये APL चा आनंद लुटता येईल . प्रसारण आणि जाहिरात माध्यमातून स्पर्धेचा खर्च काढला जाईल.