चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार रवींद्र जडेजा, जो दिल्लीविरुद्धचा शेवटचा सामना दुखापतीमुळे खेळू शकला नाही, तो आता उर्वरित स्पर्धेतून सुद्धा बाहेर पडला आहे. CSK संघाला आणखी तीन सामने खेळायचे आहेत आणि ते सामने CSK प्लेऑफमध्ये जाईल का नाही हे ठरवणार आहेत. प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी त्यांना तिन्हीही सामने भरघोस धावांनी जिंकावे लागतील. त्यांना आशा आहे की RCB आणि RR त्यांचे उर्वरित दोन्ही सामने गमावतील, त्यामुळे त्यांना रनरेटनुसार CSK ला संधी मिळू शकेल.
शिवम दुबेने DC विरुद्ध फिरकी गोलंदाजी तसेच अष्टपैलू खेळाडू म्हणून CSK मध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले . CSK चा पुढील सामना १२ मे ला मुंबई इंडियन्सशी होणार आहे. त्यानंतर ते गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्सविरुद्ध त्यांचे शेवटचे दोन सामने खेळतील. राजस्थान आज दिल्लीकडून हरले त्यामुळे चेन्नईला संधी मिळणार आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालात म्हटले आहे की, “CSK ने गेल्या काही दिवसांपासून जडेजा च्या दुखापतीचे मूल्यांकन केले आहे, परंतु त्यात अजिबात सुधारणा झालेली नाही. आणि त्याला संघात घेऊन CSK अजून संकटात पडेल. CSK इथून प्लेऑफसाठी पात्र होण्याची शक्यता फारच कमी आहे हे जाणून.
चेन्नई अनफिट खेळाडूसह धोका पत्करणार नाही.” दुखापतीव्यतिरिक्त, जडेजाचा स्वतःचा फॉर्म CSK साठी तसाही चिंताजनकच आहे. सौराष्ट्राच्या या अष्टपैलू खेळाडूने आतापर्यंत खेळलेल्या १० सामन्यांमध्ये केवळ ११६ धावा केल्या आहेत आणि फक्त ५ विकेट्स घेतल्या आहेत.
हा संभाव्य ब्रेक जडेजासाठी भारताच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मायदेशातील मालिका आणि त्यानंतर इंग्लंड दौऱ्यापूर्वी वरदान ठरू शकतो. २०२२ च्या टी-२० विश्वचषकामध्ये त्याचे स्थान आहे का नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गुजरात टायटन्स आणि लघनऊ सुपरजायांट्स आधीच प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत त्याबरोबरच मुंबई इंडियन्स बाहेर पडले आहेत. आता उर्वरित २ प्लेऑफ स्पॉट्ससाठी ७ संघ लढत आहेत.
📢 Official Announcement:
Jadeja will be missing the rest of the IPL due to injury. Wishing our Jaadugar a speedy recovery! @imjadeja
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) May 11, 2022
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि राजस्थान रॉयल्स – प्रत्येकी १४ गुणांसह दोघेही त्यांच्या जवळच्या प्रतिस्पर्धी DC, SRH, KKR आणि PBKS पासून ४ गुणांनी पुढे आहेत ज्यांचे प्रत्येकी १० गुण आहेत. RR चे तीन सामने बाकी आहेत, तर RCB चे दोन सामने आहेत. KKR चे देखील लीगमध्ये दोन सामने बाकी आहेत तर इतर सर्वांचे तीन सामने बाकी आहेत.सर्व संघ प्लेऑफ मध्ये पोहचन्यासाठी आपली उत्कृष्ट कामगिरी करत आहे.