माजी भारतीय खेळाडू युवराज सिंग याने योग्य वेळी उत्कृष्ट कामगिरी मुळे कर्णधार पदासाठी हक्कदार होता.या वेळी बोलताना एका मोठ्या धक्कादायक, उत्तम क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मुळे युवराज सिंगच्या हातातून कर्णधार होण्यासाठी संधी गमावली.
स्पोर्ट्स १८ मध्ये एका संभाषणा दरम्यान, युवराज सिंग ने संजय मांजरेकर यांच्याशी बोलत असताना त्याला कर्णधार पद का मिळाले नाही याचा खुलासा केला आहे. मुलाखती दरम्यान, युवराज सिंगने सांगितले की ग्रेग चॅपेल वादामध्ये त्याने सचिन तेंडुलकर चा पाठिंबा दिला त्यामुळे त्याला भारतीय संघाचे कर्णधार मिळू शकले नाही, असे सांगितले. BCCI च्या काही पदाधिकाऱ्यांना युवराज सिंगचा हा निर्णय आवडला नसल्यामुळे त्याला उपकर्णधार पदावरून ही काढण्यात आले.
युवराज सिंग पुढे बोलला की माजी कर्णधार बनायची दाट इच्छा होती, परंतु नंतर ग्रेग चॅपल आणि सचिन तेंडुलकर च्या वाद प्रकरणात, मी सचिन तेंडुलकर ला साथ दिली आणि त्यामुळेच माझ्या हातून सर्व काही निघून गेले. त्यावेळी मी एक असे बोलणे सुद्धा ऐकले आहे ज्यामध्ये BCCI चे पदाधिकारी असे म्हणतात की कोणाला पण कर्णधार पद द्या पण युवराज सिंगला नाही.
View this post on Instagram
युवराज सिंग आणि वीरेंद्र सेहवाग सारखे सर्वोत्तम खेळाडूंना २००७ मध्ये इंग्लंड दौऱ्या साठी संघात समाविष्ट करण्यात आले नव्हते, असे युवराज ने सांगितले. मी त्या वेळी भारतीय संघाचा उप कर्णधार सुद्धा होतो आणि राहुल द्रविड हे संघाचे कर्णधार होते. संघाचा उपकर्णधार आहे ह्या गोष्टीमुळे राहुल द्रविड नंतर कर्णधार पदासाठी मीच मोठा हक्कदार होता.पण अचानक महेंद्रसिंग धोनीला २००७ च्या टी-२० विश्वचषकासाठी कर्णधार बनवण्यात आले.
युवराज सिंग पुढे हा भलेही हा निर्णय माझ्या विरोधात घेतला असेल तरी मला त्या गोष्टीचे काहीही दुःख वाटले नाही. आज सुद्धा तशा काही घटना घडल्या तरी मी माझ्या संघातील ज्येष्ठ खेळाडूंच्या पाठीशी उभा असेन. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की युवराज सिंग भारतीय कर्णधार झाला नाही, पण २००७ चा टी -२० विश्वचषक आणि २०११ एकदिवसीय विश्वचषक जिंकण्यामागे त्याने मोठे योगदान दिले आहे.