Thursday, May 19www.babalkhabar.com : For your kind information
Shadow

आयपीएल 2022 मध्ये सुपर फ्लॉप ठरत आहे भारताचा हा मॅचविनर खेळाडू, टीम इंडियाचे वाढले टेन्शन

या वर्षाच्या अखेरीस भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया मध्ये होणाऱ्या टी -२० विश्वचषक खेळेल ज्यामध्ये IPL २०२२ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेले खेळाडू सुद्धा दिसतील.या मोसमात चांगली कामगिरी करणार्‍या खेळाडूंना भारतीय संघात स्थान देण्याची संधी असेल, परंतु विश्वचषकाच्या भारतीय संघाच्या समस्या सुद्धा वाढत चालल्या आहेत.
कारण IPL २०२२ मध्ये भारतीय संघाचा सर्वात उत्कृष्ट मॅचविनर वारंवार फ्लॉप ठरत आहे. जर तो खेळाडू पुन्हा फॉर्म मध्ये येत नसेल तर भारतीय संघासाठी ती फार मोठी समस्या आहे.

भारतीय संघाचा मॅचविनर वारंवार होत आहे फ्लॉप…IPL २०२२ मध्ये प्ले-ऑफच्या शर्यतीतून प्रथम क्रमांकाने बाहेर पडणारा संघ म्हणजे मुंबई इंडियन्स आहे, यांच्यामागे मूळ कारण सिद्ध झाले आहे ते म्हणजे रोहित शर्माचा खराब फॉर्म.रोहित हा मुंबई चा कर्णधार असून त्याने अजून ही म्हणावी अशी खास कामगिरी केली नाही.

सध्या आपण IPL २०२२ मध्ये आपण रोहित शर्माची कामगिरी पाहतच आहे , आत्ता तो एकदम खराब फॉर्मशी झुंजत आहे. परंतु या रोहित शर्मा च्या फॉर्म मुळे भारतीय संघाच्या समस्या ही वाढत आहेत. आणि आत्ता लवकरच सुरू होणाऱ्या T२० विश्वचषकासाठी भारताला या गोष्टीमुळे खूप अडचणी उद्भवू शकतात अशी काळजी संघाला लावली आहे.

IPL २०२२ मध्ये रोहित शर्मा- या मोसमात रोहित शर्मा जो MI चा कर्णधार आहे त्याच्या फलंदाजी मधून अजून पर्यंत साधे अर्धशतक ही बनलेलं नाहीये. या वर्षी तो मोठा डाव खेळण्यात सातत्याने अपयशी ठरला आहे. तर IPL २०२२ मध्ये रोहित शर्मा ने ११ सामन्यांत १८.१८ च्या सरासरीने फक्त २०० धावा केल्या आहेत. IPL च्या इतिहासात रोहित शर्माची फलंदाजीची ही सरासरी सर्वात वाईट ठरली आहे. तसेच या मोसमात त्याने ४३ ही सर्वोत्कृष्ट धावसंख्या केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!