Thursday, May 19www.babalkhabar.com : For your kind information
Shadow

आकाश चोप्राने केली मोठी भविष्यवाणी, “सुरेश रैनाप्रमाणे आता रवींद्र जडेजा कधीही चेन्नईत खेळणार नाही”

भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्रा हा चेन्नई सुपर किंग्जने रवींद्र जडेजा सोबत झालेल्या ‘गैरवर्तणुकी’ मुळे हैराण झाला आहे. तो म्हणाला की कदाचित जडेजा सारखा स्टार अष्टपैलू खेळाडू IPL २०२३ मध्ये CSK साठी खेळू शकणार नाही. चोप्राला वाटते की CSK मध्ये पडद्यामागे बरेच काही घडू शकते आणि सुरेश रैनाचे गेल्या मोसमात काय झाले ते सुद्धा त्यांनी सांगितले. बरगडीच्या दुखापतीमुळे जडेजाला उर्वरित IPL २०२२ मधून बाहेर काढण्यात आले. बुधवारी ११ मे रोजी CSK चे CEO काशी विश्वनाथन यांनी या गोष्टीची पुष्टी केली.

चेन्नई सुपर किंग्जच्या अष्टपैलू खेळाडूने या मोसमात फलंदाजी तसेच गोलंदाजी मध्ये सुद्धा खराब कामगिरी केली आहे. जडेजाने १० सामन्यांमध्ये केवळ ११६ धावा केल्या आणि फक्त ५ विकेट्स घेतल्या. जवळपास १० वर्षे चेन्नई सुपर किंग्जचा अविभाज्य भाग असलेल्या जडेजाला त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर CSK संघाने अनफॉलो केले. परंतु संघातील काही समस्यांमुळे जडेजाने अचानक मोसम सोडल्याची चर्चा पण सोशल मीडियावर सुरू झाली आहे.

आकाश चोप्रांनी केला YOUTUBE चॅनेल वर खुलासा- “जड्डू (जडेजा) इथून पुढील IPL सामन्यांसाठी उपलब्ध होणार नाही. पण मला असे वाटते की तो कदाचित पुढच्या वर्षीही CSK संघात खेळू शकणार नाही. चेन्नई कॅम्पमध्ये असे काय तरी घडले आहे ते तुम्हा आम्हाला माहीत नाही. एखादा खेळाडू कधी दुखापतीमुळे किंवा इतर गोष्टींमुळे बाहेर पडला हे सुद्धा तुम्हाला कळणार नाही.

२०२१ मध्ये सुरेश रैनाच्या बाबतीतही असेच घडले होते. काही सामन्यांनंतर, CSK ने अचानक त्याला संघातून वगळले, CSK संघाला फक्त शेवटच्या चारमध्ये स्थान मिळव ण्याचीच संधी आहे कारण ते ११ पैकी फक्त ४ सामने जिंकून आठ गुणांसह नवव्या स्थानावर आहेत.”

चोप्रा म्हणाले की “CSK चा मुंबई इंडियन्स विरुद्धचा आयपीएल २०२२ सामना कठीण झाला कारण दोन्ही संघांमध्ये खूप स्पर्धा आहे आणि काही सामने एकदम तणावात सुद्धा झाले आहेत. एक गणिती संधी होती , परंतु हे मुंबई सोबत सामना हरल्यामुळे ती सुद्धा चेन्नई ने गमावली आणि प्लेऑफ मध्ये जाण्याची संधी सुद्धा गमावली”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!