चेन्नई सुपर किंग्ज या वर्षी अत्यंत अडचणीत असणाऱ्या संघा पैकी एक आहे आणि CSK संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला असून यादरम्यान त्यांना मोठा धक्का बसला आहे. चेन्नईचा माजी कर्णधार रवींद्र जडेजा यंदाच्या IPL मधील उर्वरित सामन्यांमधून सुद्धा बाहेर पडला आहे.
रवींद्र जडेजा झाला IPL बाहेर- CSK चे CEO काशी विश्वनाथ यांनी सांगितले की, रवींद्र जडेजा चेन्नईच्या पुढील दोन सामन्यांमध्ये खेळणार नाही कारण त्याच्या बरगडीला मोठी दुखापत झाली आहे. त्यामुळे तो त्या सामन्यात खेळलाच नाही. तसेच या मोसमात सुद्धा तो खेळेल याची शक्यता सुद्धा कमी आहे. जडेजाने ज्या दिवशी चेन्नईचा कर्णधार म्हणून सुरुवात केली त्यादिवशी खूप वाईट अशी सुरुवात झाली या मोसमात त्याच्या नेतृत्वाखाली त्याने फक्त २ च सामने जिंकले आहेत. जडेजाने खेळल्या गेलेल्या १० सामन्यांत केवळ ११६ धावा केल्या आणि गोलंदाजी करताना फक्त ५ विकेट्स घेतल्या.
View this post on Instagram
त्यामुळे जडेजाला CSK संघातून वगळण्यात आले. रवींद्र जडेजाची संघातून हकालपट्टी करण्यामागे जे काही दुसरे कारण आहे ते अजून स्पष्ट झाले नाही, मात्र केवळ त्याच्या नावामुळेच नाही तर अन्य काही कारणांमुळे त्याला संघातून वगळण्यात आल्याचेही स्पष्ट होत आहे, नुकतेच जडेजाने चेन्नईला इन्स्टाग्रामवर फॉलो करणे बंद केले होते. अनफॉलो करण्याबाबत जडेजा म्हणाले की, त्याकडे फारसे लक्ष देऊ वाटत नाही.
CSK च्या CEO ने दिले मोठे वक्तव्य चेन्नई सुपर किंग्जचे CEO विश्वनाथ म्हणाले की, मला इन्स्टाग्राम आणि ट्विटर सारख्या गोष्टींकडे लक्ष द्यायला एवढा वेळ नाही त्यामुळे मी तुम्हाला याबद्दल काहीही सांगू शकणार नाही. जडेजाच्या नेतृत्वाखाली CSK ने ८ सामने पराभूत झाले संघाने मोठ्या पराभवाचा सामना केला होता पण धोनी कर्णधार झाला आणि त्याने ३ संघाला ३ सामने जिंकन्यासाठी योगदान दिले. धोनी ने मागल्या IPL सत्रात सांगितले होते की तो इथून पुढे कर्णधारपदाची जबाबदारी घेणार नाही. तसेही धोनी नंतर CSK संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यासारखा संघामध्ये एक ही अनुभवी खेळाडू न्हवता. त्यामुळेच संघाने जडेजा ला कर्णधार बनवले होते.