IPL २०२२ चा ५९ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यादरम्यान वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे खेळला जात होता. या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईचा संघाने १६ षटकांत सर्व खेळाडू बाद होऊन फक्त ९६।धावांवर त्याचा खेळ आटोपला.
चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने चेन्नईसाठी सर्वाधिक धावसंख्या केली त्याने नाबाद ३६ धावा पूर्ण केल्या, जिथे तो चांगल्या कामगिरी चे प्रदर्शन करत होता.मुंबईच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर डॅनियल सॅम्सने एकूण ३ खेळाडूंना पॅव्हेलीयन चा रास्ता दाखवला. तसेच रिले मेरेडिथ आणि कुमार कार्तिकेय यांना प्रत्येकी २-२ विकेट्स मिळवण्यात यश आले.
सामन्याच्या पहिल्याच षटकात डॅनियल सॅम्सने २ बळी घेत CSK चे कंबरडे मोडले . सामन्याच्या दुसऱ्या चेंडूवर कॉनवे एलबीडब्ल्यू झाला, तर चौथ्या चेंडूवर मोईन अली झेलबाद झाला.
चेन्नई सुपर किंग्जचा डाव १६ षटकात ९७ धावांवर आटोपला होता. चेन्नईची शेवटची विकेट धावबादच्या रूपात पडली जिथे १६ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मुकेश चौधरी इशान किशनला बळी पडला. स्ट्राइक एन्ड बदलण्यासाठी १ धाव घेऊन धोनीला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केला आणि ते धोनीला चांगलेच महागात पडले. धोनीकडून मारलेला चेंडू यष्टीरक्षक इशानच्या ग्लोव्हजमध्ये गेला. आणि जिथे चपळ आणि सज्ज ईशानने थेट विकेटवर मारा केला आणि खेळाडू धावचित झाला.
— Promaxx (@Promaxx15) May 12, 2022
इशान किशनचा थेट फटका स्टंप वरती जातो आणि मुकेश ला धावचित करतो. चेंडू विकेटला लागला तेव्हा मुकेश चौधरी क्रीजपासून खूप लांब होता. याठिकाणी धोनीसारखा चलाक आणि चपळ खेळाडू अपयशी ठरला. आऊट होण्यापूर्वी मुकेश चौधरीने ४ चेंडूत फक्त ४ धावा केल्या होत्या.
महेंद्रसिंग धोनीने मुंबईविरुद्ध सर्वाधिक धावा केल्या ज्यात त्याने ३५ चेंडूंचा सामना करताना चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ३६ धावांची शानदार खेळी केली.