IPL ही जगभरात सर्वाधिक पाहिली जाणारी लीग आहे. या लीगमधून अनेक क्रिकेटपटूंनी आपल्या करिअरची चांगली सुरुवात सुद्धा केली आहे. श्रीलंकेचे माजी दिग्गज खेळाडू तसेच मुंबई इंडियन्सचे विद्यमान मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी श्रीलंकेच्या एका गोलंदाजा बाबत मोठा दावा केला आहे. माहेला ने IPL मध्ये खेळणाऱ्या एका स्टार खेळाडूचे नाव घेतले आणि सांगितले की हा खेळाडू येणाऱ्या टी-२० विश्वचषकात श्रीलंकेसाठी सर्वोत्कृष्ट कामगिरी करेल.
महेला जयवर्धने यांनी एका संभाषणात दावा केला आहे की, ‘मला असे वाटते की टी-२० विश्वचषकात हसरंगा श्रीलंकेसाठी सर्वात महत्त्वाचा गोलंदाज ठरेल. हसरंगा हा सध्या जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंपैकी एक मानला जातो. दुष्मंथा आणि वनिंदू हे सुद्धा उत्कृष्ट खेळाडू आहेत, तसेच महेश टेकशाना IPL च्या या मोसमात चेन्नईकडून खेळत आहेत. या चारही खेळाडूंमुळे श्रीलंकेचा गोलंदाज विभाग सर्वात प्रबळ ठरत आहे, त्यामुळे हे सर्व गोलंदाज या स्पर्धेत श्रीलंकेसाठी महत्त्वाचे खेळाडू ठरू शकतात.
श्रीलंका टी-२० विश्वचषक जिंकू शकते- मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक महेला जयवर्धने म्हणाले की, IPL २०२२ मधील काही खेळाडूंची जबरदस्त कामगिरी पाहून मला असे वाटते की ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी आमच्याकडे खूप अनुभवी संघ असेल. संघाला चांगली ताकद मिळेल आणि हा संघ विरोधी संघांना आरामात पराभूत करू शकेल. या खेळाडूंच्या जोरावर श्रीलंकेला टी-२० विश्वचषक सहज जिंकता येईल, असे ते म्हणाले.
संघात आहेत अनेक युवा अनुभवी खेळाडू.- भानुका राजपक्षे श्रीलंका संघातील खेळाडूंच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर असल्याचे प्रशिक्षक जयवर्धने यांचे मत आहे. तसेच पथुम निसांका देखील टी-२० विश्वचषकातील उत्कृष्ट खेळाडू असल्याचे सिद्ध होऊ शकते. त्याचबरोबर चरित अस्लंकानेही उत्कृष्ट कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे, म्हणूनच मला वाटते की आमच्याकडे फलंदाजांचा एक अतिशय आक्रमक संघ आहे. या संघात अनेक युवा खेळाडू आहेत जे येणाऱ्या विश्वचषकासाठी खूप प्रगती करत आहेत आणि यामुळेच ते श्रीलंकेसाठी खुप महत्त्वाचे खेळाडू आहेत.
श्रीलंकेने केली टी-२० मालिकेत चांगली कामगिरी..- श्रीलंकेचा संघ फेब्रुवारी महिन्यात ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता. तेथे त्यांनी मेलबर्नमध्ये पाच टी-२० सामन्यांची मालिका जिंकली होती तसेच SCG च्या संघासोबत झालेला सामना त्यांनी सुपर ओव्हरपर्यंत सुद्धा खेळून जिंकला. जयवर्धने पुढे म्हणाला, “भानुकाने फेब्रुवारीमध्ये ऑस्ट्रेलियात काही टी-२० सामन्यात सुद्धा खूप चांगली कामगिरी केली, मला वाटते की तो नक्कीच स्पर्धा करेल आणि श्रीलंका संघाला जिंकवण्यासाठी मोलाचे योगदान देईल.’