Thursday, May 19www.babalkhabar.com : For your kind information
Shadow

५ खेळाडू ज्यांना राजस्थानने खरेदी केले,परंतु त्यांना खेळण्याची संधी सुद्धा दिली नाही….

इंडियन प्रीमियर लीग हे २००८मध्ये सुरू झाले आणि पहिलाच मोसम राजस्थान रॉयल्सच्या संघाने जिंकला होता.मात्र तेव्हापासून संघाच्या कामगिरीत सातत्याने घसरण होत आहे. राजस्थान संघ एकदाच IPL चे जेतेपद जिंकला शिवाय त्यांना दसऱ्यांदा अजूनही जिंकता आलेले नाही. बेन स्टोक्स, स्टीव्ह स्मिथ, राहुल द्रविड, अजिंक्य रहाणे, जोफ्रा आर्चर, करुण नायर, संजू सॅमसन आणि अनेक दिग्गज खेळाडू या संघाकडून खेळले आहेत.

या मोसमात संजू सॅमसन हा RR संघाचा कर्णधार आहे . IPL २०२२ मध्ये RR संघ चांगल्या कामगिरीचें प्रदर्शन करत आहे त्यामुळे तो IPL चे जेतेपद सुद्धा पटकावू शकेल. आत्तापर्यंत च्या IPL इतिहासात राजस्थान संघाचा भाग असणारे अनेक खेळाडू अध्याप त्यांच्याकडून खेळू शकले नाहीत. तर आज आम्ही तुम्हाला अशाच ५ खेळाडूंबद्दल सांगणार आहोत की जे RR संघात होते पण त्यांना खेळण्याची संधी सुद्धा मिळाली नाही.

१. जस्टिन लँगर- २००८ जस्टिन लँगर २००८ मध्ये IPL जिंकणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाचा भाग होता. २००९ च्या मोसमातही RR ने त्याला त्यांच्या संघात ठेवले पण तो कधीच पदार्पण करू शकला नाही. लँगरने राजस्थान रॉयल्सकडून एकच सामना खेळला. तो ब्रिटिश आशियाई चॅलेंज टी-२० चॅरिटी सामन्यात मिडलेक्स विरुद्ध उत्कृष्ट खेळला होता.

२. आकाश चोप्रा- २०११ प्रसिद्ध क्रिकेट समालोचक आकाश चोप्रा हा IPL मध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या संघाचा भाग होता. चोप्राचा २०११ मध्ये राजस्थान रॉयल्सने त्यांच्या संघात समावेश केला होता पण त्या मोसमात तो एकही सामना खेळू शकला नाही. आकाश चोप्राच्या IPL कारकिर्दीबद्दल सांगायचे तर, त्याने ७ सामने खेळले आहेत आणि ८.८३ च्या खराब सरासरीने केवळ ५४ धावा केल्या आहेत. त्याची IPL मधील सर्वोच्च धावसंख्या २४ आहे.

३. दीपक चहर- २०११ दीपक चहरला २०११ मध्ये राजस्थान रॉयल्सने आपल्या संघात समाविष्ट केले होते परंतु त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. दीपकने २०१६ मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्ससाठी IPL मध्ये पदार्पण केले आणि त्यानंतर २०१८ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघात सामील झाला. त्याने आतापर्यंत ६३ सामने खेळले असून ७.८ च्या इकॉनॉमी रेटच्या मदतीने त्याने ५९ विकेट्स घेतल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepak Chahar (@deepak_chahar9)


४. पॉल कॉलिंगवुड- २०१० इंग्लंडचा माजी अष्टपैलू खेळाडू पॉल कॉलिंगवूडने २०१० मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स कडून IPL मध्ये पदार्पण केले. एका वर्षानंतर, तो २०११ साली राजस्थानमध्ये सामील झाला आणि २०१२ पर्यंत तो या संघाचा भाग होता परंतु तो कधीही राजस्थानसाठी खेळू शकला नाही. यानंतर इंग्लंडचा हा अष्टपैलू खेळाडू पुन्हा IPL मध्ये दिसलाच नाही. पॉल कॉलिंगवूडने IPL मध्ये ८ सामने खेळले असून १३०.१३ च्या स्ट्राईक रेटने २०३ धावा केल्या आहेत. गोलंदाजी करताना त्याने ६.८१ च्या इकॉनॉमी रेटने ५ विकेट्स घेतल्या आहेत.

५. दिनेश चंडिमल- २०१२ श्रीलंकेचा फलंदाज दिनेश चंडिमलने आतापर्यंत IPL मध्ये एकही सामना खेळलेला नाही. उजव्या हाताचा फलंदाज २०२१ मध्ये राजस्थान रॉयल्समध्ये सामील झाला होता. मात्र, तोही त्या मोसमात राजस्थानकडून खेळू शकला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!