इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२२ हंगामामध्ये खेळाडू त्यांच्या संघाला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी जोरदार प्रयत्न करतच आहेत सोबत अनेक खेळाडूंनी पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅप साठी IPL मध्ये आपल्या खेळाने खळबळ उडवली आहे. या मोसमात या दोन्ही कॅप साठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. पर्पल कॅप च्या शर्यतीत उमरान मलिक हा सर्वाधिक बळी घेणाऱ्या यादीत होता परंतु मागील ३ सामने पाहता विकेट्स च्या अभावी तो या शर्यतीत मागे पडला आहे.
उमरान ने मिळवले ११ चेंडूत ११ लाख रुपये सनरायजर्स हैदराबादचा स्टार गोलंदाज उमरान मलिक याने आश्चर्यजनक अशी कामगिरी केली आहे आणि त्याबदल्यात बक्षीस स्वरूपात सर्वाधिक पैसे मिळवले आहेत. जेवढे पैसे पर्पल कॅप विजेत्याला पुरस्कार स्वरूपात मिळतात त्यापेक्षा ही अधिक त्याने IPL संपण्यापूर्वीच मिळवले आहे. वास्तविकता अशी की उमरान ने प्रत्येक सामन्यात सर्वात वेगवान चेंडू फेकले होते आणि मुळात सर्वात वेगवान चेंडूला एक लाख रुपये बक्षीस मिळते. त्याने आतापर्यंत खेळलेल्या ११ सामन्यांत ११ सर्वात वेगवान चेंडूचे पुरस्कार मिळवले आहेत. त्यामुळेच त्याला पुरस्कारात ११ लाख रुपये मिळाले आहेत.
View this post on Instagram
पर्पल कॅप विजेत्यालाही मिळतात फक्त 10 लाख रुपये जर पर्पल कॅप ला बक्षीस स्वरूपात मिळणाऱ्या रकमेबद्दल बोलायचे झाले तर पर्पल कॅप विजेत्या ला १० लाख रुपये रक्कम बक्षीस दिली जाते. उमरान मलिकच्या नावावर या IPL मोसमातील सर्वात वेगवान चेंडू फेकण्याचा विक्रम नोंद झाला आहे . एवढेच नाही तर, IPL इतिहासातील त्याने दुसरा सर्वात वेगवान चेंडू या मोसमात फेकला गेला आहे.
उमरान मलिक ने दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सामन्यात रोवमन पॉवेल ला १५७ किमी ताशी एक वेगाने गोलंदाजी केली आहे. शॉन टेटने फेकला होता सर्वात वेगवान चेंडू .. शॉन टेंटचा चेंडू IPL च्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू आहे. राजस्थान रॉयल्स मधून खेळणारा ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज शॉन टेंट याने दिल्ली विरुद्ध च्या सामन्यात अॅरॉन फिंचला पाण्यात आला होता.अजून ही तो विक्रम कोणी मोडू शकले नाही.