Thursday, May 19www.babalkhabar.com : For your kind information
Shadow

धोनीची ही एक चूक CSK ला पडली महागात, CSK प्लेऑफमधून बाहेर

IPL २०२२ मध्ये चेन्नई सुपर किंग (CSK) ची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची ही शेवटची आशा होती जी मुंबई इंडियन्सकडून पराभूत झाल्यानंतर संपुष्टात झाली आहे. चेन्नई सुपर किंगचा संघ १०० धावा न करताच ऑलआऊट झाला हे मात्र या पहिल्यांदाच घडले आहे, ज्याचा मुंबई इंडियन्स संघाने पुरेपूर फायदा घेतला. मुंबई इंडियन्स प्लेऑफ च्या शर्यतीतून पहिल्यांदा बाहेर पडली असली तरी हा सामना जिंकून त्यांनी चेन्नई सुपर किंग्जचा प्लेऑफचा मार्ग बंद केला. या मोसमात मुंबई संघाने सुद्धा गोलंदाजी तसेच फलंदाजी चे अत्यंत खराब प्रदर्शन केले आहे.

धोनीलाही कमाल दाखवता आली नाही IPL २०२२ च्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग (CSK) फक्त ९७धावांवर ऑल आऊट होईल असे कोणालाही वाटले नव्हते. चेन्नईचा संघ जेंव्हा जेंव्हा पराभूत होण्याच्या मार्गावर असतो तेंव्हा तेंव्हा महेंद्रसिंग धोनीला मैदानावर पाहून सगळ्यांच्याच आशा उंचावलेल्या असतात पण धोनीही काही खास कामगिरी करून दाखवू शकला नाही. त्याने आपल्या संघासाठी सर्वाधिक ३६ धावा केल्या, मात्र त्यानंतरही चेन्नई सुपर किंग्सला हा सामना जिंकता आला नाही तिथे चेन्नईचे प्लेऑफमध्ये जाण्याचे स्वप्न भंग झाले.

धोनीची एक चूक CSK ला पडली महागात IPL २०२२ मध्ये सर्वप्रथम, चेन्नई सुपर किंगने रवींद्र जडेजाला कर्णधार बनवले, जिथे त्याच्या नेतृत्वाखाली ८ सामन्यात संघाने फक्त दोनच सामने जिंकले होते, यावेळी जाडेजाच्या खराब कामगिरी मुळे संघाचे कर्णधारपद पुन्हा महेंद्रसिंग धोनीकडे सोपवण्या. धोनी कडे कमांड सोपवण्यात आली पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. यानंतरही चेन्नईने उर्वरित सर्व सामने जिंकल्यास प्लेऑफमध्ये जाण्याची शक्यता होती, मात्र संघाचे फलंदाज आणि गोलंदाज या दोघांच्याही खराब कामगिरीनंतर आता हा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. .

CSK साठी हा मोसम ठरला सर्वात वाईट… IPL २०२२ च्या सुरुवातीपासून, चेन्नई सुपर किंगची कामगिरी अत्यंत खराब होती, जिथे फलंदाजीपासून ते गोलंदाजीपर्यंत हा संघ पूर्णपणे कमकुवत दिसत होता. अप्रतिम अशी कामगिरी करण्यात CSK संघ पूर्णपणे अपयशी ठरला आहे. यामुळेच चार वेळा चॅम्पियन ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्सला यावेळीही प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आले नाही. पाहिले तर सुरुवातीपासूनच हा संघ ९ आणि १० व्या क्रमांकावरच राहिला, जे या संघाच्या प्लेऑफमधून बाहेर पडण्याचे सर्वात मोठे कारण मानले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!