
IPL मध्ये पैसे कमावण्याच्या लालसेपोटी हे भारतीय खेळाडू बनले भारतासाठी संकट, टी-२० वर्ल्ड कपपूर्वी वाढली चिंता
IPL २०२२ हळूहळू शेवटच्या दिशेने वाटचाल करत आहे. यासोबतच टीम इंडियामध्ये जखमी खेळाडूंची संख्याही वाढली आहे. आगामी काळात याचा परिणाम भारतीय संघावरही होऊ शकतो. अनेक आघाडीच्या खेळाडूंच्या दुखापतींचा परिणाम IPL वरही झाला आहे. टीम इंडियाबद्दल सांगायचे झाले तर, आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले ५ सर्वोत्तम खेळाडू IPL २०२२ खेळताना दुखापत झाले आहेत. जाणून घेऊया त्या खेळाडूंबद्दल...
१. दीपक चहर
चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने दीपक चहरला १४ कोटी रुपयांची बोली लावून आपल्या संघात समाविष्ट केले होते. IPL २०२२ च्या लिलावात दीपक हा दुसरा सर्वात महागडा खेळाडू होता. IPL २०२२ पूर्वी वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या मर्यादित षटकांच्या मालिके दरम्यान तो जखमी झाला होता. त्यानंतर तो अर्ध्या IPL मधून बाहेर होता पण दुखापतीच्या गंभीरतेमुळे त्याला संपूर्ण हंगामातून माघार घ्यावी लागली. दीपक हा IPL तसेच ट...