
मुंबई विरुद्धच्या रोमांचक सामन्यात मॅच हरल्यानंतर हार्दिक पांड्या रागाने लालबुंद, `या` खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर
इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२२ मध्ये मुंबई इंडियन्सने शुक्रवारी गुजरात टायटन्सचा ५ धावांनी पराभव केला.१७८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातचा संघ ५ जणांना गमावून १७२ धावाच करू शकला. गुजरातचा ११ सामन्यांतील हा तिसरा पराभव ठरला.
गुजरातची सुरुवात चांगली झाली- लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सला शुभमन गिल आणि रिद्धिमान साहा यांनी चांगली सुरुवात करून दिली होती. दोन्ही खेळाडूंनी १२.१ षटकात १०६ धावांची भागीदारी केली. रिद्धिमान साहाने ४० चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह ५५ धावा केल्या.
दुसरीकडे शुभमन गिलने ३६ चेंडूत ५२ धावा केल्या. गिलच्या खेळीत सहा चौकार आणि दोन षटकारांचाही समावेश होता. शेवटच्या षटकात गुजरातला ९ धावांची गरज होती, पण डॅनियल सॅम्सने अप्रतिम गोलंदाजी करत मुंबईला विजय मिळवून दिला. हार्दिक पांड्या म्हणाला, रन आऊटमुळे झाले मोठे नुकसान... हार्दिक पांड्याचा संघ गुजरात टा...