
आकाश चोप्रा ने बनवला २०२२ टी-२० विश्वचषकासाठी सर्वोत्कृष्ट संघ, या खेळाडूला काढले टीम मधून बाहेर..
भारतीय संघाची सध्या विश्वचशकासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे , तत्पूर्वी माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांनी टी-२० विश्वचषका साठी उत्कृष्ट असा भारतीय संघ निवडला आहे, त्याने सध्याच्या भारतीय संघामध्ये खेळत असलेल्या अनेक मोठ्या खेळाडूंना स्वतः निवडलेल्या संघात स्थान दिले आहे. त्यामुळे त्याने कोणत्या कोणत्या खेळाडूंची निवड केली आहे ते पाहूया.
काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेटपट्टू आकाश चोप्राने त्याच्या यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओमध्ये टी-२० विश्वचषकासाठी आपला आवडता भारतीय संघ निवडला आहे. या संघामध्ये त्याने रोहित शर्मा, विराट कोहली आणि के एल राहुल या खेळाडूंना टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी करण्यास निवडले आहे.तसेच संघाच्या मधल्या फळीत चांगल्या कामगिरी साठी श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांची निवड केली आहे.
आकाश चोप्राने स्फोटक फलंदाज आणि उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून ऋषभ पंतची या बनवलेल्य...