Thursday, May 19www.babalkhabar.com : For your kind information
Shadow

Day: May 10, 2022

चेन्नई सुपर किंग्ज प्लेऑफमधून बाहेर ? २०२३ च्या लिलावात घेणार या ३ दिग्गज खेळाडूंना….

चेन्नई सुपर किंग्ज प्लेऑफमधून बाहेर ? २०२३ च्या लिलावात घेणार या ३ दिग्गज खेळाडूंना….

क्रिकेट मराठी
चेन्नई सुपर किंग्ज (CSK) साठी IPL मोसम इतका काही खास नाही. आतापर्यंत १० पैकी ७ सामने गमावून हा संघ प्ले-ऑफमधून बाहेर पडला आहे. आता संघ पुढील हंगामाच्या तयारीला सुरुवात करेल. यावेळी संघाची कामगिरी गोलंदाजीपासून ते फलंदाजीपर्यंत एकदम खराब होती. अॅडम मिलने आणि दीपक चहर यांच्या अनुपस्थितीमुळे ३ विजय उत्तीर्ण होऊन पार पडले. आता यातून धडा घेत संघाच्या पुढील मोसमात युवा आणि अनुभवी खेळाडूंचा समावेश केला जाईल असे संकेत चेन्नई कडून येत आहेत. या लेखात आम्ही पुढील मोसमात चेन्नई सुपर किंग्ज कोणत्या ३ खेळाडूंना खरेदी करू शकतात हे सांगणार आहोत. १- मिचेल स्टार्क यावेळी चेन्नई सुपर किंग्जने दीपक चहर आणि अॅडम मिलने यांना गोलंदाज म्हणून खरेदी केले, परंतु यावेळी दोन्ही खेळाडू दुखापतीमुळे अध्याप संघात खेळू शकले नाहीत, त्यामुळे सध्याच्या मोसमात संघाला प्लेऑफमधून बाहेर पडावे लागणार आहे. ऑस्ट्रेलियाचा...
Video : IPL चा सर्वात वाईट DRS, आऊट झाल्या नंतरही खेळाडूने घेतला रिव्ह्यू….

Video : IPL चा सर्वात वाईट DRS, आऊट झाल्या नंतरही खेळाडूने घेतला रिव्ह्यू….

क्रिकेट मराठी
IPL २०२२ च्या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्सने ५३ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा ७५ धावांनी पराभव केला.यामुळेच लखनऊ सुपरजायंट्स हा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर मजल मारण्यात यशस्वी झाला आहे. या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्सने प्रथम फलंदाजी करत १७६ धावा केल्या. प्रत्युत्तरात या लक्ष्याचा पाठलाग कोलकाता नाईट रायडर्स करू शकला नाही आणि संपूर्ण संघ हा फक्त १०१ धावांवर गारद झाला. या सामन्यातही कोलकाता नाईट रायडर्सचे फलंदाज फ्लॉप ठरले असून, आंद्रे सेल्स वगळता एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आलेली नाही. सामन्या मध्ये चाहत्यांचे लक्ष वेधून घेणारे अनेक प्रसंग आले असले तरी, कोलकाताचा फलंदाज अनुकुल रॉयने बाद झाल्यानंतर रिव्ह्यू घेतला, ज्यामुळे चाहते सुद्धा खूप आश्चर्यचकित झाले. वास्तविक ही घटना १३ व्या षटकाची आहे, कोलकाता नाईट रायडर्सच्या इनिंगमध्ये १३ वी ओव्हर आवेश खानने केली होती. आवेश खानन...
भारतीय वंशाच्या या महान क्रिकेटपटूच्या निधनामुळे क्रिकेट विश्वात पसरली शोककळा

भारतीय वंशाच्या या महान क्रिकेटपटूच्या निधनामुळे क्रिकेट विश्वात पसरली शोककळा

क्रिकेट मराठी
दक्षिण आफ्रिकेचा रहिवाशी परंतु महान भारतीय वंशाचा वेगवान गोलंदाज हुसैन अयुब यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते आत्ता 81 वर्षांचे होते. हुसैन आयुब हे भारतीय वंशाचे असून वर्णद्वेषाच्या धोरणामुळे कधीही भारत देशासाठी खेळू शकले नाहीत. अयुब हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील देशाच्या इतिहासातील महान खेळाडूंपैकी एक होते मात्र वर्णभेदाच्या धोरणामुळे त्यांना देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधीच मिळाली नाही. किडनीच्या आजाराशी झुंज देत असताना शनिवारी पोर्ट एलिझाबेथ येथे त्यांचे निधन झाले. आयुब यांनी ICC च्या विकास समितीत महत्त्वाची भूमिका बजावली होती. या महान वेगवान गोलंदाजाला त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या जीवनात अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला आहे, ज्याचा उल्लेख त्याने २०२० च्या त्याच्या 'क्रॉसिंग बाउंडरीज' या पुस्तकात केला आहे, ज्याचा वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार क्लाइव्ह लॉयड यांन...
error: Content is protected !!