
आवेश खानच्या रॉकेट षटकाराने राशिद खान ची उडवली झोप, ३०० च्या स्ट्राईक रेट ने केल्या धावा….
गुजरातने IPL २०२२ च्या ५७ व्या सामन्यात वर्चस्व गाजवले आणि प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ ठरला. जेथे संघाच्या एकत्रित कामगिरीनंतर संघाने एकतर्फी विजय नोंदवला. तत्पूर्वी, नाणेफेक जिंकल्यानंतर गुजरातने फलंदाजी केली आणि लखनऊला एक छोटेसे लक्ष्य दिले, या सामन्या वेळी चेंडू बॅट वर नीट येत न्हवता आणि हे गुजरात टीमने लक्षात घेतले. याच गोष्टीच्या अभ्यासाने GT च्या गोलंदाजांनी फायदा घेतला. गुजरातच्या फलंदाजांनी त्यांच्या संघाला असे काही सल्ले दिले की जेणेकरुन LSG च्या फलंदाजांना फलंदाजी करण्यास त्रास होईल. फलंदाजांना फुल लेंथ च्या चेंडूवर खुप समस्या जाणवत होती आणि गुजरातच्या गोलंदाजांनी त्याचा पुरेपूर फायदा घेतला.
टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना हार्दिकच्या संघाने खेळलेल्या २० षटकांत ४ विकेट्स गमावून १४४ धावा केल्या. शुबमनने ६३ धावांसह उत्कृष्ठ अशी खेळी केली. येथे संघाला जलद धावा करण...